Koleshvar Pathar and Kamalgad
near Rāireshwar, Mahārāshtra (India)
Viewed 456 times, downloaded 10 times
Trail photos
Itinerary description
महाबळेश्वर व रायरेश्वर पठारांच्या मधोमध धोम धरणाच्या बाजूला कोळेश्वर पठार आहे. त्याच्या पूर्व टोकाला कमळगड आहे. आज आमच्या ट्रेकची सुरूवात धोमच्या पश्चिमेला असलेल्या जोर गावातून झाली. साधारण ५०० मी उंची चढून आम्ही कोळेश्वर पठारावर आलो. पठारावर दाट जंगलातून ८ किमी चालत खिंडीपर्यंत पोचलो. पुढे कमळगडावर चढलो. गड बघून धरणाच्या काठी नांदगणे या गावात उतरून आमचा ट्रेक संपला.
या ट्रेकमधे तीव्र चढ, कातळ चढाई, नाळ असे कठीण भाग काहीच नाहीत. परंतु एकूण ८ तास, १९किमी, ८००मी चढाई अशी ही फिटनेसची कसोटी होती.
वाई ते नांदगणे चांगला रस्ता आहे. परंतु नांदगणे ते जोर कच्चा रस्ता आहे.
जोर-कोळेश्वर चढताना वाटेत बिबट्याच्या अस्तित्वाच्या खुणा (droppings) दिसल्या.
कोळेश्वर पठारावर पलिकडच्या रायरेश्वर/केंजळगड बाजूने चढणे पण शक्य आहे. त्याबाजूला खाली जांभळीपासून वाट आहे. जांभळीला कच्चा रस्ता आहे, किंवा रायरेश्वर पासून उतरता येते.
या ट्रेकमधे आम्ही पठारावर आल्यावर उजवीकडे/पूर्व दिशेला मार्गक्रमण केले. विकीलॅाकवर अरूण कुंभार यांचा एक ट्रेल आहे ज्यात पश्चिमेचा कोकण कड्यापर्यंत जाणारा मार्ग दाखवला आहे.

Waypoints
Mountain pass
3,930 ft
Khind
Khind before kamalgad. Straight goes to nandgane, left goes to kamalgad.
You can add a comment or review this trail
Comments