Activity

कदम नाळ चढाई आणि कोलत्या नाळ उतराई माथेरान

Download

Author

Trail stats

Distance
7.67 mi
Elevation gain
2,730 ft
Technical difficulty
Moderate
Elevation loss
2,730 ft
Max elevation
2,563 ft
TrailRank 
19
Min elevation
586 ft
Trail type
Loop
Moving time
3 hours 25 minutes
Time
7 hours 33 minutes
Coordinates
2124
Uploaded
April 14, 2024
Recorded
April 2024
Be the first to clap
Share

near Mātherān, Mahārāshtra (India)

Viewed 2 times, downloaded 0 times

Itinerary description

*माथेरान च्या विविध नाळ चढाई आणि उतराई*

*भटकंती मार्ग*:
बुरुजवाडी - कदम नाळ चढाई - चौक पॉइंट ते अलेक्झांडर पॉइंट चाल - कोलत्या नाळ उतराई - बुरुजवाडी

*दिनांक:*
14 एप्रिल 2024

*भटकंती विशेष*:
♦️माथेरान नेहमीच आवडीची जागा आणि त्यात अपिरीचीत वाटेने भटकंती करायची मजाच काही वेगळी.
♦️या भटकंती मध्ये 2 नाळ ने चढाई आणि उतराई केली त्या म्हणजे *कदम नाळ* आणि *कोलत्या नाळ*.

*कदम नाळ*: याची सुरुवात बुरुजवडी गावातून होते. लिटिल चौक पॉइंट आणि मोठा चौक पॉइंट यामधून जाणारा नाला म्हणजे कदम नाळ.
♦️या वाटेला कदम हे नाव लोकल search rescuer आणि सामाजिक कार्यकर्ता रघुनाथ कदम यांच्यावरून ठेवले असे कळते.
♦️वाटेत 2 ठिकाणी अवघड पॅच मिळाले (दोरशिवाय चढता येते पण दोर वापरलेला बरा).
♦️ही नाळ वरच्या टप्प्यात रामबाग जंगलात निघते (फांगळी माळ व कुंभी माळ चा भाग).

लागलेला कालावधी: साधारण 3 तास

*कोलत्या नाळ*:
♦️जंगलातून उत्तरेकडे चाल करत अलेक्झांडर पॉइंट च्या जवळ नाळेची सुरुवात होते. दाट जंगल असल्यामुळे वाट पटकन सापडत नाही (महितीगार सोबत असावा).
♦️दाट झाडी झुडपातून खाली उतरत असताना आम्हाला पण शंका आली की हीच वाट असेल का नाही. थोड आणखी खाली उतरल्यावर नाळेचे अफाट स्वरूप दिसले.
♦️उभी आणि चिवट उतराई जाम थकवते.
♦️भरपूर पाणी सोबत असावे.
♦️नाळेतून उतरून काटवण जाणाऱ्या पुलाजवळ वाट संपते.

लागलेला कालावधी: साधारण 4 तास

Comments

    You can or this trail